"स्वरंग" एक नवीन आणि वेगळ्या विषयाला प्रेक्षकांसमोर मांडत आहे. सर्व सामान्य माणसाच्या डोक्यात खूप सारे प्रश्न खूप वेळा अनुत्तरीतच राहतात.
का ? कसं ? कधी ? मला का नाही ? मला कुठे मिळेल ? मला का नाही कळतं ? कोण मला ह्याची माहिती देईल ??? असे प्रश्न घेऊन ...आणि 'COMMON माणूस' हा "स्वरंग"चा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
"स्वरंग" सध्या वेगवेगळ्या प्रांतामधे आपले नाव गाजवत आहे मग सर्वांच्याच आवडतीचा विषय कसा दुर्लक्षीत राहील ?
"स्वरंग" सादर करत असलेल्या 'स्वाद' या कार्यक्रमात घर बसल्या आणि घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ कसे बनावता येतात हे साध्या-सरळ आणि सोप्प्या पद्धतीने दाखवले जाणार आहे. घरातले छोटे-मोठे सगळ्यांनाच आता 'स्वाद' मुळे आता खऱ्या अर्थाने स्वादिष्ट आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
सामाजिक जीवनात सर्व जण कोणत्या ना कोणत्या समाज, धर्म, जात-पात या बंधनात कळत-नकळतपणे बांधील असतोच पण, खरंच आपल्याला धर्मांच्या बाबतीत तेवढी माहिती असतेच का ?
"स्वरंग" वाहिनी च्या 'स्वधर्म' मालिकेतून आता प्रत्येक धर्माबाबत माहिती दिली जाणार आहे. कोणत्याही एकाच धर्माबाबत नाही तर "स्वरंग"च्या 'स्वधर्म' मालिकेतून प्रत्येक धर्मांची माहिती दिली जाणार आहे.