कलाकार सांगताहेत पडद्यामागील रंगतदार किस्से...
कलाविश्वातील कामकाज लॉकडाउनमुळे ठप्प असल्याने नवे चित्रपट, मालिका असं काहीही प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. मात्र घरातच बसून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं यासाठी "स्वरंग" कसोशीने प्रयत्न करत आहे. 'किस्से बहाद्दर' या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांना कलाकारांचे नाटकाच्या पडद्यामागील तसेच शूटिंग मध्ये घडलेले भन्नाट किस्से ऐकता येणार आहेत.
मालिकेचे मागिल भाग पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांच्या रम्य, गूढ आणि रंजक गोष्टींचा अनुभव आता घरी बसून घेता यावा म्हणून 'स्वरंग' वाहिनीने ‘Mango holidays’ सोबत एक नविन उपक्रम हाती घेतला आहे.
यामध्ये विदेशातील वेगवगळी ठिकाणं दाखवली जाणार आहेत, तसेच त्या ठिकाणांची माहिती आणि महती देखील सांगितली जाणार आहे.
मालिकेचे मागिल भाग पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
"स्वरंग" वाहिनीचा मुख्य हेतू हा विविध कलागुणांना वाव देणं यासोबतच विविध कलागुणांतून माहिती देणं सुद्धा आहे.
"स्वरंग"च्या 'MUSICAL कट्टा' या कार्यक्रमातून जुन्या नवीन गाण्यांची मैफिल रंगणार आहे. 'MUSICAL कट्टा' मध्ये वेगवेगळे कलाकार येऊन आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वाद्यांमधून गाणी सादर करणार आहोत.
काही जुन्या गाण्यांना नवीन रूपात तर काही नवीनच गाणी वेगळ्या स्वरूपात सादर करणार आहेत.
"स्वरंग" एक नवीन आणि वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडत आहे. सर्व सामान्य माणसाच्या डोक्यात खूप सारे प्रश्न खूप वेळा अनुत्तरीतच राहतात.
का ? कसं ? कधी ? मला का नाही ? मला कुठे मिळेल ? मला का नाही कळतं ? कोण मला ह्याची माहिती देईल ??? असे प्रश्न घेऊन.
...आणि 'COMMON माणूस' हा "स्वरंग"चा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
सामाजिक जीवनात सर्व जण कोणत्या ना कोणत्या समाज, धर्म, जात -पात या बंधनात कळत-नकळतपणे बांधील असतोच पण, खरंच आपल्याला धर्मांच्या बाबतीत तेवढी माहिती असतेच का ?
"स्वरंग" वाहिनी च्या 'स्वधर्म' मालिकेतून आता प्रत्येक धर्माबाबत माहिती दिली जाणार आहे. कोणत्याही एकाच धर्माबाबत नाही तर "स्वरंग"च्या 'स्वधर्म' मालिकेतून प्रत्येक धर्मांची माहिती दिली जाणार आहे.